Share

परभणीत अनलॉक; सात जूनपासून चारवाजेपर्यंत व्यवहारांना मुभा

Published On: 

परभणी : कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्यामुळे राज्यात अनलॉक करण्यास सुरूवात झाली आहे. राज्य सरकारच्या वतीने तसे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, बाजारापेठांसदर्भातील आदेश स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांना घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सात जूनपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.

कोरोनाची दुसरी लाट संपत आली असली तरी तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. त्यामुळे अनलॉक करताना काळजी घेण्यात येत आहे. त्यानुसार राज्य सरकारने स्थानिक पातळीवर रुग्ण संख्या पाहता निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चार वाजेपर्यंत सर्व बाजारपेठा सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. तसेच चार ते पाचवाजेपर्यंत इतर हालाचालींना मुभा देण्यात आली आहे. त्या नंतर मात्र, परभणीमध्ये पूर्ण संचारबंदी लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

असे असले तरी शनिवार आणि रविवार या दोन दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाजारपेठ पूर्णत: बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलय. त्यामुळे शनिवार आणि रविवार जिल्ह्यात कडक संचारबंदी पाळण्यात येणार आहे. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!