Share

शहरातील अभ्यासिकांना लॉकडाऊनमध्ये अनलॉक करा- आ. सतीश चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील अभ्यासिकांना ‘लॉकडाऊन’ मधून सूट देण्यात यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.13) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली आहे.

सतीश चव्हाण यांनी विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान अंशत: लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच शनिवार व रविवार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच बंद राहणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २१ मार्च रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा, २७ मार्च रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, ११ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍यांमध्ये ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शहरात राहून अभ्यासिकांमध्ये हे विद्यार्थी अभ्यास करून या परीक्षेची तयारी करीत आहेत.

येणारे आठ-पंधरा दिवस या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. अगोदरच औरंगाबाद शहरातील अभ्यासिका या ५० टक्के उपस्थितीत सुरू आहेत. त्यात आपण घेतलेल्या निर्णयामुळे सदरील अभ्यासिका या सोमवार ते शुक्रवार रात्री ९ तर शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या दृष्टीने मोठी गैरसोय होत आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून औरंगाबाद शहरातील अभ्यासिका सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!