🕒 1 min read
औरंगाबाद : उन्हाळ्याच्या तोंडावर शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी समस्या निर्माण होत आहेत. कधी पाईपलाईन फुटल्याने तर कधी तांत्रिक बिघाडामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात विघ्न येत आहेत. शुक्रवारी (दि. १२) रात्री इसारवाडी येथे ७०० मिलिमिटर व्यासाची अशुद्ध पाण्याची पाईपलाईन फुटली. महापालिकेने तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले असले तरी शनिवारी (ता. १३) रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी व्यक्त केली आहे.
शहराला पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना खिळखिळी झाली आहे. त्यामुळे वारंवार पाईपलाईन फुटुन पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाईपलाईन फुटने व तांत्रिक बिघाडाच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा सुरू झाल्यामुळे पाण्याची मागणी वाढलेली असतांना दुसरीकडे विविध अडचणींमुळे पाणी पुरवठा विभाग शहराची तहान भागवितांना त्रस्त आहेत.
दरम्यान शुक्रवारी रात्री जल शुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी ७०० मिलिमिटर व्यासाची पाईपलाईन फुटली. हा प्रकार लक्षात येताच पाणी पुरवठा विभागाने तात्काळ दुस्तीचे काम सुरू केले. दिवसभर काम सुरूच होते. रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास पाइपलाइन सुरू होईल.
सध्या १२ मिलिमिटर व्यासाची पाइपलाइन सुरू आहे. असे असले तरी ही पाइपलाइन फुटल्याने पुढील चार ते पाच दिवस पाण्याचे वेळापत्रक कोलमडणार आहे. कुठे कमी पाणी मिळेल तर कुठे कमी दाबाने पाणी मिळेल. तसेच काही भागाचा पाणी पुरवठा एका दिवसाने पुढे जाऊ शकतो, असे किरण धांडे यांनी सांगितले.
अधिकारी रात्रभर घटनास्थळी
पाइपलाइन फुटल्याचा प्रकार लक्षात येताच जायकवाडी येथून पाणी उपसा बंद करण्यात आला. त्यानंतर दुरूस्तीचे काम सुरू झाले. त्यासाठी रात्रभर अभियंता घुले, बावीस्कर, डी. पी. गायकवाड, नूर महापालिकेचे सात कर्मचारी ठाण मांडून होते. पाइपलाइनला मोठे भगदाड पडल्याने पाइप बदलावा लागला, असे धांडे यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणासोबतही जाणार-खा.जलील
- लसीकरणासाठी रेड झोनमधील १९ वॉर्ड मनपाच्या टार्गेटवर
- कोरोना वाढतोय पण निर्लज्जपणे थुंकणाऱ्यांना आवर घालणार कोण ?
- पुण्यात 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी मिळणार ?
- औरंगाबादकरांनी पाळला उत्स्फूर्त लॉकडाऊन, परवानगी असलेले दुकानेही बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

