🕒 1 min read
औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार जवळ असलेल्या गणेशवाडी जिल्हा परिषद शाळेतून अज्ञात चोरट्यांनी संगणक, एलईडी, टीव्ही, इन्व्हर्टर असा 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेप्रकरणी शिक्षकांच्या फिर्यादिवरून वडोद बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या कोरोना परिस्थिती मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. असे असले तरी वाहेगाव शिवारात असलेल्या गणेशवाडी जिल्हा परिषद शाळेतून शाळेतील खोलीचे दरवाजे तोडून एक मर्फी कंपनीचा 32 इंची एलइडी स्मार्ट टीव्ही, एक आफ्टेक कंपनीचा स्पीकर माईक, ल्युमिनिस कंपनीचा इन्व्हर्टरव बॅटरी असा एकूण 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने शाळेतून लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या चोरीप्रकरणी लक्ष्मीकांत कोलते यांच्या फिर्यादीवरून वडोद बाजार पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह. या चोरीच्या घटनेचा तपास वडोद बाजार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन लहासे तपास करीत आहे
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! अनुकंपा नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, समाजकल्याण अधिकाऱ्यावर गुन्हा
- बीड डीसीसी निवडणूक; मातब्बर रिंगणात उतरल्याने चुरस वाढली
- घाम पुसण्यासाठी मास्क खाली केला तरी होतोय दंड!
- कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या पथकालाच ठोठावला दंड!
- आंदोलन, वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडेंचा ‘वैद्यनाथ’ पुन्हा सुरू


