मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी काल केलेल्या वक्तव्यावरुन भाजपच्या अनेक नेत्यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली. तालिबान विषयी आपले मत व्यक्त करताना जावेद अख्तर यांनी यावेळी तालिबानवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंगदल या संघटनांवर देखील टीका केली आहे. याच मुद्दयावरुन भाजपचे नेते त्यांच्यावर चांगलीच पेटून उठले आहेत. भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी देखील अख्तर यांच्यावर टीका केली आहे.
‘जावेद अख्तर यांचे हे वक्तव्य लाजीरवाणे आहे. त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिदू परिषदेचे देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारे आहे. हे अपमानजनक आहे, असं राम कदम म्हणाले आहेत. ‘जोपर्यंत जावेद अख्तर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्याचे आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे चित्रपट या मातृभूमीमध्ये चालू देणार नाही’, असा इशारा देखील राम कदम यांनी जावेद अख्तर यांना दिला आहे.
#संघ तथा #विश्वहिंदूपरिषद के करोडों कार्यकर्ताओ की, जब तक हाथ जोड़कर #जावेदअख्तर माफी नही मांगते. तब तक उनकी तथा उनके परिवार की कोई भी #फिल्म इस #माभारती के भूमि पर नहीं चलेगी. pic.twitter.com/ahWgVQWuvH
— Ram Kadam (@ramkadam) September 4, 2021
संघाबाबत वक्तव्य करताना थोडा विचार करायला हवा होता की, याच संघातील लोक आज राजगादी संभाळत आहेत. राजधर्म चालवत आहेत. तालिबानी विचारधारा असती तर त्यांनी हे केलंच नसतं, असं म्हणत जावेद अख्तर यांना माफी मागण्यास सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘करुणा शर्मा यांच्याबाबत मजकूर प्रकाशित केल्यास हायकोर्टाचा अवमान’, धनंजय मुंडेंच्या वकिलाचे माध्यमांना पत्र
- ‘मुख्यमंत्र्यांच्या घरातील दोघे पॉझिटिव्ह; अन् बेअक्कल संज्या म्हणतो पापी लोकांनाच कोरोना होतो’
- ‘तुमच्या कार्यक्रमांना गर्दी चालते, फक्त गणेशोत्सवालाच नको; ही कसली पद्धत?’ राज ठाकरेंचा हल्लाबोल
- ‘ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट’, राज ठाकरेंचा आरोप
- पडळकरांचे वडेट्टीवारांना ‘उद्धव ठाकरे स्टाईल’ पत्र, सहा वेळा ‘किंबहुना’ शब्दाचा वापर


