🕒 1 min read
सिंधुदुर्ग : शिवसेना नेते संजय राऊत हे शनिवारी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या खेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपावर टीका केली. भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली. पाप केलं की कोरोना होतोच, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली होती.
त्यांच्या या टीकेवरून भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांची अक्कलच काढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरातील दोन जण पॉझिटिव्ह होते अन् संजय राऊत म्हणतात पापी लोकांनाच कोरोना होतो असे म्हणत हल्लाबोल केला आहे.
मी नेहमी सांगत आलो संज्याला काडीची अक्कल नाही. काल परवा एका सभेमध्ये बोलताना संज्या म्हणतो की ज्याने पाप केलंय त्यांनाच कोरोना होतो पण संज्या विसरला मुख्यमंत्र्याच्या घरातील दोन सदस्यांना कोरोना होऊन गेलाय.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 5, 2021
निलेश राणे यांनी ट्विट केले की, ‘मी नेहमी सांगत आलो संज्याला काडीची अक्कल नाही. काल परवा एका सभेमध्ये बोलताना संज्या म्हणतो की ज्याने पाप केलंय त्यांनाच कोरोना होतो. पण संज्या विसरला मुख्यमंत्र्याच्या घरातील दोन सदस्यांना कोरोना होऊन गेलाय’ या शब्दांत राणे यांनी जहरी टीका केली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
खेडमध्ये राऊत म्हणाले की, भाजपला कोरोना झाला म्हणून भाजप सत्तेतून बाहेर गेली. पाप केलं की कोरोना होतोच. तसेच त्यांनी उपस्थितांना मास्क घालण्याचे आवाहन केले. तुम्ही मास्क नाही घातलं तर उद्धव ठाकरे आपली चंपी करतील. आधी माझी चंपी करतील. नंतर तुमचं नाव घेऊन फटकारतील. कोरोनाची युती होऊ शकत नाही, तुला मंत्रीपद देतो, महामंडळ देतो असं चालत नाही. मुख्यमंत्री आपले आहेत. सांगतायेत नियम पाळाय. कोरोना कुठूनही घुसतो, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहित शर्माने या वर्षी कसोटीत केल्या ‘इतक्या’ धावा; सर्व भारतीय फलंदाजांना टाकले मागे
- रोहितची शतकी खेळी, भारत ३ बाद २७०; तिसऱ्या दिवसाअखेरीस विराटसेनेकडे १७१ धावांची आघाडी
- शतकी खेळीसह रोहितनं गाजवले मैदान; मोडला मैथ्यू हेडनचा मोठा विक्रम
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
