Share

‘ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट’, राज ठाकरेंचा आरोप

Published On: 

पुणे : ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तो पर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला. पण हा पाठिंबा देताना ‘ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकीला स्थगिती देऊन काही होणार नसेल, त्याऐवजी केवळ महापालिकांवर प्रशासक नेमून सरकारचा उगीच फायदा व्हायला नको’, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पुणे महानगरपालिकेच्या तयारीसाठी मनसे तयारीला लागली आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होत आहेत. महिन्याभरात राज ठाकरे यांचा हा आठवा पुणे दौरा आहे. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, ओबीसी आरक्षण मुद्दा निकालात निघेपर्यंत निवडणुकीला स्थगिती दिली पाहिजे. पण त्यामुळे हे काम पटकन होणार असेल तर याला स्थगिती मला मान्य आहे. निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचे असेल, त्यात काही काळंबेर असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवे. सगळ्या मनपा सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत.’

‘मला असं वाटतं की पुढे असं नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. जातिनिहाय जनगणनेबद्दल विचारणा झाली असता राज म्हणाले, सरकारकडे यंत्रणा आहे. त्यामुळे मनात आणलं इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकतं. ती काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!