Share

ना रहाणे, ना स्मिथ, युवा खेळाडूकडे असेल दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार पदाची धुरा

Published On: 

पुणे : पुणे येथे झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली.

आता या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या पूर्वार्धातील लढतींनाही तो मुकणार आहे. यामुळे तो नेतृत्व करीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला देखील मोठा धक्का बसला आहे. कारण श्रेयस आयपीएलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करतोय.

श्रेयसच्या अनुपस्थितीत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा कोणाकडे सोपवली जाईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काहींचे म्हणणे आहे की, दिल्लीच्या संघाची धुरा अनुभवी अजिंक्य रहाणे किंवा रवीचंद्रन अश्विनकडे सोपवली जाऊ शकते. परंतु अजिंक्य रहाणे व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गेल्या दोन तीन वर्षांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. अशीच परिस्थिती अश्विनचीदेखील आहे. त्यामुळे या दोघांकडे दिल्लीचं कर्णधारपद दिलं जाणार नाही.

दरम्यान, दिल्लीच्या संघाने नुकत्याच झालेल्या लिलावाद्वारे ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज स्टिव्ह स्मिथला स्वतःच्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. त्यामुळे चांगले नेतृत्वगुण असलेला खेळाडू दिल्लीच्या संघात आहे. परंतु दिल्लीचा संघ स्मिथकडे कर्णधारपद न सोपवता एका तरुण भारतीय खेळाडूच्या नावाचा विचार करत आहे. त्या खेळाडूचं नाव आहे ऋषभ पंत.

भारतीय संघातील आक्रमक डावखुरा फलंदाज असलेला ऋषभ पंत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये त्याची बॅट तळपतेय. आयपीएलमध्येदेखील त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थापन ऋषभ पंतकडे कर्णधारपद सोपवू शकतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!