पुणे : पुणे येथे झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी पार पडेल.
मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली. या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले आहे.
श्रेयस अय्यरच्या जागी टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारने टी-२० मालिकेच्या अखेरच्या दोन सामन्यांत ५७ आणि ३२ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.
आता एकदिवसीय संघात संधी मिळाल्याच चांगल्या कामगिरीचा त्याचा प्रयत्न असेल. तसेच पहिला एकदिवसीय सामना मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या भारतीय संघाचे दुसरा सामना जिंकत तीन सामन्यांच्या या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे लक्ष्य असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- भारत बंद : शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी पटोले काँग्रेस नेते-मंत्र्यांसह करणार उपोषण
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !


