मुंबई : येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलचा १४वा हंगाम सुरु होत आहे. कोरोना संसर्गामुळे मागील वर्षी युएईमध्ये आयपीएल स्पर्धा भरवीण्यात आली होती. यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा मुंबई इंडीयन्ससाठी खास असणार आहे. कारण भारतीय संघाचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळणार आहे.
अर्जुन तेंडूलकर नुकताच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघव्यवस्थापनाने खेळाडूचे शिबीर भरवले आहे त्यासाठी काही खेळाडू एकत्र आले त्यात अर्जुन तेंडूलकरचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सने याबद्दल एक ट्विट करुन माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये शिबीरात सामाविष्ट असणाऱ्या विविध खेळाडूंचे फोटो दिसत आहे. काही दिवसातच त्यांचा सराव सुरु होणार आहे. आयपीएल लिलावाच्या वेळी मुंबई इंडियन्सने अर्जुनला अपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले होते.
????✅#OneFamily #MumbaiIndians @ishankishan51 @iamanmolpreet28 @MarriottBonvoy pic.twitter.com/SNDBsoJ5vz
— Mumbai Indians (@mipaltan) March 25, 2021
अर्जुन तेंडुलकरला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने २० लाख रुपये एकढी किंमत मोजली. यंदाच्या आयपीएलची सुरुवात ही ९ एप्रिल रोजी होणार आहे. सलामीचा सामना हा आरसीबी आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान होणार आहे. अर्जुन तेंडुलकरचा समावेश त्याच्या वडिलांमुळे झाला आहे अशी टिका करुन त्याला ट्रोल करण्यात आले होते. मात्र अर्जुनला संघात खेळायची संधी मिळते का याची उत्सुकता आयपीएलच्या चाहत्याना नक्कीच असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- भारत बंद : शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी पटोले काँग्रेस नेते-मंत्र्यांसह करणार उपोषण
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !


