पुणे : येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल १४ चा बिगुल वाजणार आहे. आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नुकताच आयपीएलच्या पुर्वतयारीसाठी पुण्यात दाखल झाला आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्स संघाला या हंगामापूर्वी मोठा झटका लागू शकतो.
कारण टीम मॅनेजमेंटकडून मिळालेल्या माहितीनुसार स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आतापर्यंत पूर्णपणे फिट झालेला नाही. त्याचबरोबर याबाबत सीएसकेला कोणती ही माहिती नाही की, जडेजा केव्हा संघसोबत जो़डला जाईल.
रवींद्र जडेजा बाबत सीएसकेचे सीईओने माहिती दिली आहे. सीईओचे म्हणाले की, ‘जडेजा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे आणि या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.’ तसेच त्यांनी पुढे सांगितले की, ‘जडेजा संघासोबत केव्हा जोडला जाईल, याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. जडेजा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे आणि तो आपल्या फिटनेसवर काम करत आहे.’
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी कसोटी सामन्यात जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे जडेजाला इंग्लडविरुद्ध झालेल्या कसोटी आणि टी-20 मालिकेत सहभागी होता आले नाही. त्याचबरोबर पुणे येथे सुरु असलेल्या वनडे मालिकेत ही समावेश केला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- भारत बंद : शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी पटोले काँग्रेस नेते-मंत्र्यांसह करणार उपोषण
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !


