मुंबई : गेल्या वर्षीपासून कोरोना रोगाने घातलेल्या संसर्गामुळे शिक्षणक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शाळा, महाविद्यालये पूर्णतः नियमितपणे सुरु करण्यात आलेले नाहीत. अशातच परीक्षांच्या हंगामात पुन्हा एकदा कोरोनाचा जोर अधिक वाढला असून यंदा मागील वेळी पेक्षा स्थिती गंभीर आहे. यामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून अनेक विद्यापीठांच्या परीक्षांबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.
तर, राज्यातील विद्यापीठांच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे हे सोयीचे नसल्याने त्यांना ऑफलाईन परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. मात्र, राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाईन परीक्षा घेणं अशक्य आहे असं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.
यामुळे उर्वरीत सर्व विद्यापीठांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जातील. आज कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या.आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असा निर्णय झाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. तसेच, अंतिम वर्षांच्या परीक्षांना व निकालांना प्राधान्य दिला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस म्हणाले होते, मी नाशिक दत्तक घेतोय; आता काँग्रेसने करून दिली ‘ती’ आठवण !
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या धास्तीने बाजारपेठांत गर्दी; संचारबंदीचा नियम धाब्यावर
- रॉयल शेतकरी ! ३५ वर्षांनी घराण्यात मुलीचा जन्म, आजोबांनी ‘लक्ष्मी’ला हेलिकॉप्टरने आणलं घरी
- गयावया करा, उधार घ्या किंवा डाका टाका पण ऑक्सिजनचा पुरवठा करा; उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
- ‘नानाजी, हवे तर प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा हो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

