बीड: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बुधवारी मुख्यमंत्री पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता असल्याच्या धास्तीने जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठ, किराणा दुकाने, पेट्रोल पंपांवर नागरिकांनी गर्दी केली हाेती. या वेळी शारीरिक अंतर, ताेंडावर मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबतचे नियम अनेकांनी धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. वडवणीत बाजारपेठांसह दुकानावरही गर्दी उसळली हाेती. अर्धे शटर बंद ठेवून दुकाने आतून सुरूच होती.
गेवराई शहरासह ग्रामीण भागात दुपारनंतर बाजारपेठ व रस्त्यांवर शुकशुकाट होता. तर धारूर शहरातही संचारबंदीचा बोजवारा उडाल्याचे दिसून अाले. केज शहरात किराणा, भाजीपाला आणि फळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी हाेऊ नये म्हणून तहसीलदारांनी रस्त्यावर उतरून ‘वाॅच’ ठेवला. तर पाटोदा शहरातही पेट्रोल पंप, किराणा दुकानांवर गर्दी हाेती. बीड शहरात अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर रस्त्यावर विनाकारण कुणीही फिरू नये, यासाठी पोलिसांनी राउंड घेवून विनाकारण फिरणाऱ्यांना चाेप दिला.
कडक लॉकडाऊन लागणार असल्याच्या धास्तीने बुधवारच्या आठवडी बाजारावर बंदी असतानाही शहरातील बाजारतळावर चांगलीच गर्दी उसळली होती. किराणा, कृषी दुकानांवरही नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस व महसूल प्रशासनाने आवाहन करूनही नागरिक कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीत. पोलिस बंदोबस्त असतानाही अनेक जण फिजिकल डिस्टन्सचा नियम धाब्यावर बसवून विनामास्क बाजारात फिरताना दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण…; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
- पराभवासह केकेआरने केली चेन्नईच्या संघाची ‘या’ नकोशा विक्रमात बरोबरी
- शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिमन्यू काळेंची बदली अतिशय चुकीची; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
- गयावया करा, उधार घ्या किंवा डाका टाका पण ऑक्सिजनचा पुरवठा करा; उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
- ‘नानाजी, हवे तर प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा हो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
