राजस्थान : समाजात मुलीच्या जन्माबाबत आता दृष्टिकोन बदलत आहे. ‘ति’च्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी कधी कुटुंबीय गावात हत्तीवरून साखर वाटतात, तर कधी घराला सजवून खास स्वागत करतात. आता, घराण्यात तब्बल ३५ वर्षांनी लक्ष्मी जन्माला आली म्हणून शेतकरी आजोबांनी वेगळ्याच थाटात बाळाचं स्वागत केलंय.
एकाबाजुला समाजात मुलीच्या जन्माला ओझे समजून नवजात लक्ष्मीला डावललं जात किंवा बाळंतीणीला त्रास दिला जातो, अशा घटना वाचनात येतात. मात्र, जे कुटुंबीय ‘ति’च्या जन्माचं हटके स्वागत करून समाजात आदर्श निर्माण करतात त्यांचं कौतुक तर झालच पाहिजे. कुटुंबात ३५ वर्षांनी कन्यारत्नाचा परिस स्पर्श लाभला म्हणून शेतकरी आजोबांनी पीक विकून कमावलेल्या पैशातून ‘ति’चं जंगी स्वागत केलं आहे.
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील निंबडी चांदवत या छोट्याशा खेड्यातील सामान्य शेतकरी मदनलाल प्रजापती यांच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला. मदनलाल प्रजापती यांची ती नात असून तिला घरी आणण्यासाठी हेलीकॉप्टरची सोय केली. इतकंच नाही तर गावात उभारण्यात आलेल्या हॅलीपॅड वरून घरात अनेपर्यंत मार्गामध्ये उभे राहून गावकऱ्यांनी देखील पुष्पवृष्टी केली.
खरं तर या कोरोनाच्या कठीण काळात या घटनेमुळे नक्कीच आपल्या सर्वांना एक समाधान मिळत असेल, आनंद झाला असेल. दरम्यान, या मुलीचा जन्म आईच्या गावी झाला होता. मूळ घरी आणण्यासाठी आजोबानी पीक विकून हाती आलेल्या ५ लाखांमधून हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. आणि मुलीच्या आईसह मुलीच्या वडिलांनी देखील हेलिकॉप्टरने प्रवास करत मूळ घर गाठले. या बाळाचं नाव ‘सिद्धी’ असं ठेवण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस म्हणाले होते, मी नाशिक दत्तक घेतोय; आता काँग्रेसने करून दिली ‘ती’ आठवण !
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या धास्तीने बाजारपेठांत गर्दी; संचारबंदीचा नियम धाब्यावर
- मोदींच्या मतदारसंघात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, नवीन रुग्ण दाखल करून न घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !
- गयावया करा, उधार घ्या किंवा डाका टाका पण ऑक्सिजनचा पुरवठा करा; उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
- ‘नानाजी, हवे तर प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा हो’


