बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण पोलिसांनी ७ क्विंटल गांजा व २ महागडी वाहने असा १ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. तिघे जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेतय पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी हे पथकासह ग्रामीण भागात पेट्रोलिंग करीत असतांना यादरम्यान मलकापूर ते जांबुळधाबा रोडवर हॉटेल टी पॉईंटजवळ पहाटे तीन वाजेच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान मलकापूरहून बोदवडकडे भरधाव येणाऱ्या दोन गाड्यांना पोलिसांनी अडविले.
गाड्या थांबविताच दोन्ही वाहनांतील चार जण उतरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. एकाला पोलिसांनी पकडले असून, त्यांच्या ताब्यातील इर्टिका व इनोव्हा या दोन्ही गाड्यांतून सुमारे सात क्विंटल गांजा किंमत अंदाजे सत्तर लाख रुपये, इनोव्हा, इर्टिका किंमत अंदाजे चाळीस लाख रुपये असा एकूण एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- दो हंसो का जोडा! विलासरावांच्या पुतळ्याशेजारी गोपीनाथ मुंडेचा पुतळा उभारणार
- महंगाई की मार! पेट्रोल-डिझेल नंतर आता खत ही महागले
- सव्वीस कोटींच्या ठेवी बुडवणारा चेअरमन अखेर शरण
- नोकरीचे आमिष दाखवत साडे आठ लाख रुपये उकळले
- धक्कादायक! किरकोळ कारणावरून चुलत्याने पुतणीचा कोयत्याने कान कापला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

