मुंबई – पुण्यात ३० जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानी याने आक्षेपार्ह वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शर्जिलने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये शर्जिलला कोर्टाचा दिलासा मिळाला आहे.
याबाबत कोणत्याही ही प्रकारची हिंसा आपल्या वक्तव्यानंतर झालेली नाही तसेच समाजात तेढ निर्माण झाला नसल्याने दाखल झालेला गुन्हा हा आधारहीन असल्याचा दावा शर्जिलने केला आहे. मंगळवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर शर्जिलच्या याचिकेवर सुनावणी झाली.
याबाबत पुणे पोलिसांनी शर्जिलला समन्स बजावत मंगळवारी सकाळी १० वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होती. या चौकशीसाठी शर्जिलही हजर राहणार असल्याची माहिती त्याचे वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयाला दिली. मुंबई उच्च न्यायालयाने शर्जिल उस्मानी हा तपासात सहकार्य करत असल्यास त्याच्यावर पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर पुढील सुनावणीपर्यंत त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी तोंडी हमी सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी दिल्यावर न्यायालयाने शर्जिलला बुधवारी पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार नाराज ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
- महंगाई की मार! पेट्रोल-डिझेल नंतर आता खत ही महागले
- सव्वीस कोटींच्या ठेवी बुडवणारा चेअरमन अखेर शरण
- नोकरीचे आमिष दाखवत साडे आठ लाख रुपये उकळले
- धक्कादायक! किरकोळ कारणावरून चुलत्याने पुतणीचा कोयत्याने कान कापला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

