Share

विरोधीपक्षनेता असावा तर असा! नागपूरच्या पठ्ठ्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन एकहाती गाजवलं

Published On: 

मुंबई- कोरोनाच्या सावटाखाली सुरु झालेलं महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आज संपत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या अधिवेशनात मॅन ऑफ दि सिरीज ठरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याचा पुरेपूर वापर करून या अधिवेशनात जो हल्ला चढवला त्यामुळे सत्ताधारी नेते मंडळी अक्षरशः घायाळ झाल्याचे दिसून आले आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांना हे अधिवेशन आयुष्यभर लक्षात राहील असे हे अधिवेशन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून ते मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणापर्यंत पुराव्यासहित केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी हतबल झाल्याचे दिसून आले.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी सरकारची एवढी पीछेहाट झाली की संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अधिवेशनात फडणवीस यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला.गृहमंत्री,मुख्यमंत्री यांना देखील या हल्ल्याचा प्रतिकार करता आला नाही. या प्रकरणात ठाकरे सरकारची प्रचंड नाचक्की झाली होती. ठाकरे सरकार आणि गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं.

वक्तृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्वाचा उत्तम परिचय देत देवेंद्र फडणवीस यांनी निर्विवादपणे एकट्यानेच हे अधिवेशन गाजवलं. कोविड सेंटरमधील महिलांवरील अत्याचार, कोरोना काळात झालेला मोठा भ्रष्टाचार,शेतकऱ्यांच्या समस्या, मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरण, मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू, सचिन वाझेंच्या अटकेची मागणी, राज्यातील कायदा-सुव्यवस्था या मुद्यांवर फडणवीस यांनी सत्ताधारी मंडळींनाधारेवर धरलं.

देवेंद्र फडणवीसांनी यांनी क्राइम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझेंच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला होता.वाझे यांच्या अटकेची आणि निलंबनाची देखील जोरदार मागणी केली. सचिन वाझेंचा, हिरेन यांच्याशी संपर्क होता त्याचे पुरावे आहेत, मनसुख यांचं शेवटचं लोकेशन माझ्याकडे आहे असा दावा त्यांनी केला. आज अखेर या सचिन वाझे यांची बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणात फक्त खूनीच शोधणार नाही, तर त्यापलीकडीलही माहिती मिळवेन, माझा अधिकार आहे तो. मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा असे सांगत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मंगळवारी विधानसभेत आक्रमक झाल्यानंतर ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत आले.

शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात विदेशातील सेलिब्रिटींनी ट्वीट केले होते यानंतर भारतीय सेलिब्रिटी असणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि लता मंगेशकर यांनी देखील ट्वीट केले होते. यानंतर देशमुख यांनी सेलिब्रेटींची चौकशी केली जाईल असं वक्तव्य देशमुख यांनी केलं होते यावरून देखील फडणवीसांनी सरकारला कोंडीत पकडले. त्यानंतर यू-टर्न घेत सचिन-लता आमचे दैवत आहेत. मला आयटीसेलची चौकशी असं म्हणायचं होतं अशी सारवासारव करावी लागली.

यानंतर बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुकवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा मुद्दा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. यावेळी देवेंद्र पडणवीस चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. याशिवाय, फडणवीस यांनी श्रीरामपूरमध्ये अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याचं सांगत पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवरुन गृहखात्यावर टीकेची तोफ डागली.

दरम्यान,आज तर फडणवीस यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. अन्वय नाईक प्रकरणात कोर्टाचा निकाल आल्यानंतर गृहमंत्र्यांनी हेतुपुरस्सरपणे आपल्यावर आरोप केल्याचं सांगत त्यांनी हा हक्कभंग दाखल केला असल्याने आज देखील त्यांचीच सर्वात जास्त चर्चा होत आहे. एकंदरीत फडणवीस हे एकटे सत्ताधारी तीन पक्षांना भारी पडल्याचे चित्र आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!