Share

हिंदू – मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन, एकत्र केल नमाज व हनुमान चालीसा पठण

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : राज्यात लाऊडस्पीकरचा वाद आणखी चिघळला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी संध्याकाळी जाहीर केले की, जर मशिदीबाहेर भोंग्यांवर अजान दिली गेली, तर तेथे हनुमान चालिसा पठण केले जाईल. यानंतर एकीकडे औरंगाबादमध्ये एफआयआर दाखल झाला आहे, तर दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा आदेश पाळायला सुरवात केली आहे.

पोलिसांच्या नोटिशीनंतर मनसे कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू झाली आहे. कल्याण आणि डोंबिवलीत मनसेच्या 20-25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कल्याण डोंबिवलीत पोलिसांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह ५० कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. हनुमान चालिसा वादाबाबत राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर हिंदू -मुस्लिम संघर्ष निर्माण झाला असताना उस्मानाबादेत हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. हिंदू -मुस्लिम बांधवानी एकत्र नमाज व हमुमान चालीसा पठण केली.

मानवता हाच खरा धर्म असा नारा देत उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे हिंदू मुस्लिम बांधवानी एकत्र येत नमाज व हनुमान चालीसा पठण केली. हिंदू मुस्लिम ऐक्याची पार्श्वभूमी असलेल्या उस्मानाबाद येथील केशेगाव येथे सायंकाळी हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आले व मगरीब नमाज अदा केली. त्यानंतर टाळ्या वाजवत हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र हनुमान चालीसा पठण केली. सर्व धर्म एक आहेत केवळ राजकीय हेतूने सध्याचे राजकारण सुरु आहे, फोडा व राज्य करा ही निती आजही वापरली जात आहे. मात्र तरुणांनी एकत्र यावे, असा सदेश यावेळी या बांधवानी दिला. हिंदू मुस्लिम एकत्र नमाज व चालीसा पठण हा उपक्रम समाजिक व जातीय सलोखा जपणारा ठरणार आहे.

मुंबई पोलिसांनी राज ठाकरेंना कलम 149 अंतर्गत नोटीस पाठवली आहे. लाऊडस्पीकरवर जिथे अजान वाजवली जाईल तिथे हनुमान चालिसा पाठ करा, असे आदेश राज ठाकरे यांनी समर्थकांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवली आहे. मनसेच्या 300 कार्यकर्त्यांना नोटिसाही पाठवण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!