Share

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; राठोड, मुंडेंच्या मुद्द्यावरून विरोधक सभागृह दणाणून सोडणार ?

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे. सरकार अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचं नाटक करतंय. वाढीव वीज बिल प्रश्नी आणि संजय राठोडप्रश्नी उघडं पडण्याची भीती असल्यानं सरकारला अधिवेशनातून पळ काढायचाय, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंमत असेल, तर अविश्वास ठराव आणून दाखवा, असं खुलं आव्हान दिलं होतं.

दरम्यान, या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. त्यातच आता अधिवेशनावर कोरोनाचं सावट आलं आहे. कोरोनानं विधानभवनात शिरकाव केलं असल्याचं समोर आलं आहे. अधिवेशन सुरु होण्याआधी 25 जण कोरोना बाधित झाले असल्याची माहिती आहे.

तर, सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचं चित्र आहे. विरोधकांकडे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेनेचे काल मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला अडचणीत आणू शकतात. सरकारला कामकाज करायचं नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!