🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबादचा बिबी का मकबरा म्हणजे वास्तूशिल्पकलेचे बेजोड उदाहारण आहे. याच ऐतिहासिक बीबीका मकबरा व परिसराचे आता पर्यटन विभागाच्यावतीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार हे काम केले जाणार आहे, हे विशेष. या कामाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी (दि.२०) महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी भेट देऊन बीबीका मकबरा व परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी भारतीय पुरातत्व खात्याचे व्यवस्थापक गिरी यांच्याशी चर्चा केली.
पर्यटन विभागाच्यावतीने बीबी का मकबरा परिसराचा विकास व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये रस्त्यातील अतिक्रमण काढणे, वाहतूक वळवणे, रस्ता तयार करणे व विद्युत रोषणाई करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी बीबीका मकबरा परिसरास भेट देऊन परिसराची व औरंगाबाद लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही पाहणी केली.
बीबीका मकबरा समोरील गार्डन व मकबऱ्याच्या आतील परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम, शहर अभियंता एस. डी.पानझडे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख उपायुक्त नंदकिशोर भोंबे, विद्युत कार्यकारी अभियंता देशमुख, नगर रचनाकार जयंत खरवडकर,स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्ट मॅनेजर स्नेहा बक्षी, स्नेहा नायर आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- औरंगाबादेत आता स्तनदा मातांना कोरोना लस घेण्यास परवानगी-आरोग्य अधिकारी
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- ‘मलिकांनी आमचे बुट पाहण्यापेक्षा कोकणात जावे, जनता त्यांना कोल्हापूरी चप्पल दाखवतील’

