मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग यामध्ये मराठी भाषिक राहतात. तो भाग केंद्र केंद्रशासित करावा, ही शिवसेनेची भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी पत्र देखील लिहिलेले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिके संघटनेने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला केला होता. तसेच गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, भगव्या फलकास काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सीमाभाग प्रकरणावर भाष्य केले होते. ज्या प्रकारे बेळगावमध्ये कर्नाटक भाजपाप्रणित एक संघटना आहे, ते आमच्या मराठी लोकांवर ज्याप्रकारे हल्ले करत आहेत. आमच्या शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती. यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी शिवसेनेला टोला लगावत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
‘बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं अनावश्यक हस्तक्षेप का करीत आहेत? हा मुद्दा फार पूर्वीपासून होता. सामान्य लोकांना त्रास होत आहे. आमचे कर्नाटक राज्य सरकार पंतप्रधानांचे नाव हस्तक्षेप करण्यासाठी का आणत आहे? माझ्या म्हणण्यानुसार कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही.’ असे जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
यानंतर आता शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषिकांवरील अत्याचाराबाबत मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, ‘लोकसभेत बोलू न देणे हे योग्य नाही. बेळगाव प्रश्न हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्याचा योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. बेळगाव मध्ये जी मारहाण झाली हा पुरावा सुप्रीम कोर्टात सादर करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! पाणीपुरी, नुडल्स खाल्ल्याने चिमुकलीचा मृत्यू, ४० जणांना विषबाधा
- ‘राज्याच्या कामात केंद्राची विनाकारण ढवळाढवळ’, मंत्री अशोक चव्हाणांची टीका
- प्रेमा तुझा रंग कसा? पत्नीच्या निधनानंतर जालन्यात वृद्ध पतीची आत्महत्या
- प्रेमाचा करुण अंत! रेल्वेखाली उडी घेऊन युवक-युवतीची आत्महत्या
- राष्ट्रवादीचे बॅनर, ‘सब जगह से पड रही है मार, धन्यवाद मोदी सरकार!’


