Share

प्रेमा तुझा रंग कसा? पत्नीच्या निधनानंतर जालन्यात वृद्ध पतीची आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

जालना : आजच्या तरुणाईला वाटते की ते प्रेमात काहीही करू शकतात. त्यांच्याइतके प्रेम ना कोणी केले, ना कोणी करणार. प्रेम ही फक्त तरुणाईच करू शकते असा अनेकांचा समज आहे. पण तो समज जालन्यातील एका वृद्ध पतीने खोटा ठरविला आहे. अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे पत्नीच्या निधनानंतर पतीने स्वतःला पेटवून आत्महत्या केल्याची घटना घटली आहे. पांडुरंग भापकर (वय ७९) असे मृत पतीचे नाव आहे.

लखमापुरी येथील पांडुरंग भापकर यांची पत्नी आसराबाई पांडुरंग भापकर यांचे १० मार्च रोजी अल्पशा अजाराने निधन झाले. या घटनेनंतर पांडुरंग भापकर यांचा धक्का बसला. रविवारी (दि.१४) सायंकाळी पांडुरंग भापकर हे स्वतःच्या शेतात गेले. शेतातील तुरीच्या खोडक्यावर जाऊन त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. यात ते शंभर टक्के जळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

लखमापुरीचे पोलीस पाटील संतोष वखरे यांनी घटनेची माहिती पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी गोंदी पोलिसांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!