🕒 1 min read
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरात बॅनरबाजीने चांगलीच रंगत आणली आहे. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला टार्गेट केले आहे. तर येथील नगर पालिकेनेही कर थकविणाऱ्यांची नावे बॅनरवर झळकावली आहेत.
उस्मानाबादवासियांना वाढदिवस, कार्यक्रम यासह इतर सण-उत्सवांचे विविध बॅनर पहायची सवय झाली आहे. मात्र, सध्या शहरात उभे केलेल्या दोन बॅनरमुळे नागरिकांची चांगलीच करमणूक होत आहे. इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीने बॅनरद्वारे पंतप्रधान मोदी सरकारवर टीका केली आहे.
‘ बेसुमार वाढलेली महागाई, पेट्रोलचे दर शंभरी पार, खड्ड्यात गेलेला शेअर बाजार, आकाशाला भिडलेली महागाई’ अशा आशयाचे मजकूर बॅनरवर छापण्यात आले आहे. शिवाय मोदी सरकारचेही बॅनरवरच धन्यवाद मानले आहेत. एकूणच उपहासात्मक बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधल्याचे दिसत पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे नगर पालिकेनेही करबुडव्यांची चांगलीच ओवाळणी केली आहे. अनेकांनी नळपट्टी, घरपट्टी भरलेली नाही. शिवाय ते वारंवार सूचना व नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा शहरातील प्रमुख ५० थकबाकीदारांची नावे बॅनरवर छापली आहेत. ऐन पालिकेच्या गेटजवळच हे बॅनर उभे केले आहे. हे बॅनर अनेकांचे लक्ष वेधत आहे. किमान यामुळे तरी ते करबुडवे कर भरतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- शरद पवारांनी अनिल देशमुखांना केले सेफ, डॅमेज कंट्रोल म्हणून परमबीर सिंहांची विकेट पडणार ?
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
