नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री विश्वेश्वर टुडु (Union Minister Vishweshwar Tudu) यांच्यावर सरकारी अधिकाऱ्याने गंभीर आरोप केला आहे. रिव्यू मीटिंग दरम्यान काही कारणामुळे मंत्री विश्वेश्वर टुडु प्रचंड रागावले. आणि त्यांनी मिटिंग खोली आतून बंद करत अधिकाऱ्यांवर वार करण्यास सुरुवात केली. जिल्हा उप-निर्देशक अश्विनी कुमार मलिक आणि असिस्टेंट डायरेक्टर देबाशीष महापात्रा अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
दरम्यान या घटनेत अश्विनी कुमार मलिक गंभीर जखमी झाले आहेत. तर देबाशीष महापात्रा यांचा हाथ तुटला आहे. त्यांना बारीपदा येथील पीआरएम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दोन अधिकाऱ्यांनी मंत्री विश्वेश्वर टुडु यांच्याविरोधात पोलीस कारवाई केली आहे. यानंतर देबाशीष महापात्रा यांनी म्हटले की, ‘मंत्री विश्वेश्वर टुडु यांनी आमच्यावर अगोदर प्रोटोकॉल चे उल्लंघन केल्याचे म्हणत रागावले.आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, जर आम्ही आदर्श आचार संहितेच्यावेळी फाईल घेऊन त्यांच्या कार्यालयात दाखल झालो असतो, तर ते अनुचित ठरले असते. आगामी पंचायत निवडणुकीच्या कारणामुळे राज्यात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे ते नाराज झाले. आणि आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर अश्विनी कुमार मलिक यांनीही मंत्री विश्वेश्वर टुडु यांनी आम्हाला प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान या सर्व आरोपांचा विश्वेश्वर टुडु यांनी विरोध केला आहे. निवडणुकीपूर्वी माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित दोन अधिकारी माझ्याकडे आले होते. आम्ही साधारण अर्धा तास चर्चा केली. लंचची वेळ होती. रिव्यू मीटिंग पूर्ण नाही होऊ शकली. त्यामुळे मी त्यांना उद्या पार्ट या असे म्हटले. मात्र ते पुन्हा काही आलेच नाही. केंद्र सरकारद्वारा प्राप्त ७ करोड रुपये कसे खर्च झाले याबाबत मी त्यांना फाईलसोबत घेऊन येण्याचे म्हटले होते. अशी प्रतिक्रिया मंत्री विश्वेश्वर टुडु यांनी दिली आहे. मंत्री विश्वेश्वर टुडु केंद्रातील भाजप सरकारमधील जलशक्ति राज्य मंत्री आहेत. दरम्यान या घटनेनंतर त्यांच्यावर आता टीकेची झोड उठत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- छाबय्या विहंग गार्डनवर लावलेल्या दंड माफी प्रकरणी चंद्रकांत पाटलांनी घेतली राज्यपालांची भेट
- कृषिपंप वीजजोडणीत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन..!
- “मुख्यमंत्र्यांनी घरबसल्या किमान लसीकरणावर तरी फेसबुक लाईव्ह करावे”, भातखळकरांचा टोला
- सुखी रहा… आनंदी रहा… मुलीला सासरी पाठवताना आ. प्रसाद लाड यांना अश्रू अनावर
- औरंगाबादेतील महाराणा प्रताप पुतळा उभारणीला इम्तियाझ जलील यांचा विरोध म्हणाले; त्याऐवजी..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

