मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीचा नुकताच विवाह झाला. मुलीला सासरी पाठवतानाचे फोटो आमदार लाड यांनी ट्विट केले आहे. सुखी रहा … आनंदी रहा… असे प्रसाद लाड म्हणाले आहेत. फोटोत आमदार लाड यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून येत आहेत. प्रसाद लाड यांची कन्या सायलीचा विवाह शांतनूसोबत पार पडला.
प्रसाद लाड ट्विटमध्ये म्हणतात, “तुझ्या केवळ अस्तित्वाने रोमरोम माझे झंकारले, तुझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा तुझ्यामुळे कळाला मज अर्थ जीवनाचा,” असे ट्विट प्रसाद लाड यांनी केले आहे.
सायली बेटा,
सुखी रहा…आनंदी रहा…
आमच्या दोघांचेही आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत!#SailygotShant pic.twitter.com/AOKQC8KsBT— Prasad Lad (@PrasadLadInd) January 21, 2022
भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या शाही विवाहसोहळ्याला राजकारण्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत सर्वांची उपस्थिती लावली होती. आमदार लाड यांच्या मुलीचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला केंद्रीय आणि राज्याच्या राजकारणातल्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
या विवाहसोहळ्यास भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती. या समारंभात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार प्रितम मुंडे, खासदार मनोज कोटक आदींनी उपस्थिती लावली.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांची मोठी घोषणा; नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी मंजूर
- …त्यामुळे प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही- प्रियंका गांधी
- “गोव्यातील भाजपमध्ये फुटताय बंडाळीचे फटाके”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- अभिमानास्पद! जम्मू काश्मीरातील मच्छल खोऱ्यात छत्रपती शिवरायांची मूर्तीस्थापना
- “काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

