मुंबई: कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न राज्य सरकार आणि प्रशासकीय पातळीवर केले जात आहेत. मात्र, तरीही राज्याच्या १६ जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ५५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्राच्या १६ जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा दुसरा डोस घेण्याचे प्रमाण ५५% पेक्षा कमी आहे. खंडणी, पेंग्विन पालन, नारायण राणे अटक आदीप्रकणावरून थयथयाट यातच सरकारचा सगळा वेळ ‘सत्कारणी’ लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी घरबसल्या किमान लसीकरणावर तरी फेसबुक लाईव्ह करावे ही नम्र विनंती.” अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या १६ जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा दुसरा डोस घेण्याचे प्रमाण ५५% पेक्षा कमी आहे.
खंडणी, पेंग्विन पालन, नारायण राणे अटक आदीप्रकणावरून थयथयाट यातच सरकारचा सगळा वेळ 'सत्कारणी' लागत आहे.
मुख्यमंत्र्यांनी घरबसल्या किमान लसीकरणावर तरी फेसबुक लाईव्ह करावे ही नम्र विनंती. pic.twitter.com/H7vjFSeV48— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 22, 2022
दरम्यान सोलापूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, जालना, जळगाव, बुलढाणा, लातूर, यवतमाळ, परभणी, अकोला, हिंगोली, नांदेड, बीड, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दुसरी मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या अजूनही ५५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती समोर आली आहे. तर सांगली, गोंदिया कोल्हापूर आणि चंद्रपूर येथे हे प्रमाण ९४ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या:
- औरंगाबादेतील महाराणा प्रताप पुतळा उभारणीला इम्तियाझ जलील यांचा विरोध म्हणाले; त्याऐवजी..
- अभिनेते अमोल कोल्हे प्रकरणावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया म्हणाले, “मी सुद्धा गोडसेची भूमिका”
- “…त्यांच्या प्रचारासाठी मोदी-शहा येणार का?”, संजय राऊतांचा सवाल
- “डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू”, भाजपच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर
- अभिनेत्री अथिया आणि केएल राहुल यावर्षी बांधणार रेशमगाठ?, सुनील शेट्टीच्या ट्वीटमुळे चर्चेला उधाण


