Share

औरंगाबादेतील महाराणा प्रताप पुतळा उभारणीला इम्तियाझ जलील यांचा विरोध म्हणाले; त्याऐवजी..

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप पुतळा उभारणीवर एक कोटी निधी खर्च करण्याऐवजी त्यांच्या नावाने ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण(Sunil Chavan) व मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत पत्राद्वारे मागणी केली आहे.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार अतुल सावे व अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप पुतळा उभारण्याचे कामास सुरवात करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला बैठकीतच खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध करुन पुतळा उभारणीवर खर्च करण्यात येणाऱ्या निधितुन ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी केली होती तसेच त्यासंबंधी पत्राद्वारे सुध्दा त्यांनी मागणी केली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, महाराणा प्रताप उदयपूर, मेवाड येथील शिशोदिया घराण्याचे महान राजा होते. त्यांच्या शौर्यामुळे आणि दृढनिश्चयामुळे त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर अजरामर आहे.

ते लहानपणा पासूनच शूर, निर्भय, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी होते. अनेक युध्दात त्यांनी पराक्रम दाखवुन शत्रुंवर विजय प्राप्त केलेला आहे. अशा थोर, महान शूरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारुन काहीही साध्य होणार नाही. महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिकी शाळाच असेल. कारण त्यांच्या पासुन प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील युवक व युवती सैनिकी शाळांंमधुन देश संरक्षणासाठी प्रशिक्षण घेतील. या सैनिकी शाळेमधून सक्षम आणि प्रशिक्षित लष्करी अधिकारी घडविण्याचे काम केले जाईल. येथून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर, हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच तसेच विविध इतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुध्दा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमुद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!