🕒 1 min read
दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकार विविध मुद्यांवरून अडचणीत पाहायला मिळत आहे.सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली होती. या प्रकरणात नाट्यमय घडामोडी आणि बैठकांचं सत्र सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यातील भाजप खासदारांसह अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर अनेक आरोप करत महाराष्ट्रात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी थेट लोकसभेत बोलताना केली होती. संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात खासदार नवनीत राणा यांनी तक्रार केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील प्रश्नांवर संसदेत बोलल्यामुळे सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलाय.
दरम्यान, यासंदर्भात अरविंद सावंत यांनी देखील लोकसभेत आपली बाजू मांडली आहे. ‘माझ्या आयुष्यातील 50 वर्षे मी सार्वजनिक क्षेत्रात घालवली आहेत, त्यातील 25 वर्षे मी संसदीय क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे, संसदीय क्षेत्राची मर्यादा, भाषेची मर्यादा याचं नेहमीच पालन करत आलोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा शिवसैनिक आपल्यासमोर उभा आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाला अपमानित केलं नाही, कुणासाठी अपमानित शब्दाचा प्रयोगही केला नाही. त्यामुळे, आता याप्रकरणी मीच चौकशीची मागणी करतोय,’ असे भावनिक उद्गार त्यांनी काल लोकसभेत बोलताना काढले आहेत. यासंदर्भात एक ट्विट करून त्यांनी व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘५ एप्रिलपर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही तर गनिमी काव्याने धमाका करू’
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- भारत बंद : शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी पटोले काँग्रेस नेते-मंत्र्यांसह करणार उपोषण
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
