🕒 1 min read
पुणे: कोरेगाव भीमा येथे शनिवारी २०४ वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी अनेक मान्यवरांनी येथे उपस्थिती लावली आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), नितीन राऊत (Nitin Raut) व इतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांशी संवाद साधत असताना रामदास आठवले म्हणाले, शौर्य दिन यांच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. १८१८ साली या ठिकाणी ५०० जणांनी बलिदान दिले होते. या निमित्ताने सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत विचारले असता रामदास आठवले यांनी नवीन वर्षाचा काय संकल्प केला आहे ते देखील त्यांनी सांगितले आहे. आठवले म्हणाले, नविन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकारला घालवायचा आहे. रिपब्लिकन पक्ष अत्यंत मजबूत करायचा आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायचा, असा संकल्प सांगत महाविकास आघाडी सरकारवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- मागील सात वर्षांत मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली?
- सुधीर मुनगंटीवारांनी केले अजित पवारांचे कौतुक! म्हणाले, “ते कधीही…”
- बैलगाडा शर्यतीच्या स्थगितीसंदर्भात अजित पवारांनी केले भाष्य;म्हणाले…
- निवडणुकीपूर्वीच अखिलेश यादवांना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश
- “परबांनी शपथनामा क्रूझ पार्टीत पत्ती मारुन लिहीला नाही ना?”, मुनगंटीवारांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
