सोलापूर: उजनीच्या पाण्याच्या प्रश्न सोलापूर जिल्ह्यात सध्या चांगलाच पेटला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूरकर धारेवार धरत आहेत. लाकडी – लिंबोडी योजनेच्या माध्यमातून सोलापूरच्या हक्काच पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप पालक मंत्र्यांवर होत आहे. त्यामुळे पालकमंत्री मागच्या दहा ते पंधरा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याकडे फिरकलेच नाहीत. उजनीच्या पाण्याच्या प्रश्नावर आता विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला.
जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे येत्या ३ तारखेला सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी दिली आहे. “खासदारांचा फंड आणि महापालिकेने नियोजन केल असत तर सोलापूरकरांचा पाण्याच्या प्रश्न मिटला असता मात्र, भगवी वस्त्र धारण करणारे सोलापूरचे खासदार टाळ कुटून सोलापूरकरांना पाणी मिळू दे म्हणून देवाला प्रार्थना ही करत नाहीत”, विद्या चव्हाण हे सोलापूर दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
