मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्र सरकारवर सतत निशाणा साधल्यानंतर रिपब्लिक टीव्हीसह अन्य काही वाहिन्यांचा टीआरपी स्कॅमसमोर आला आणि अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली.
आता आणखी एका प्रकरणावरून आज त्यांना अचानक अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.
यावरून आता राजकारण पेटलं असून भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘अर्नब गोसामीसारख्या सीनियर पत्रकाराला कसलीही नोटीस नसताना खेचून मारून पोलिस व्हॅनमध्ये टाकण्यात आलं व अपमानित करून अटक करण्यात आली. जे राज्य सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अशाच प्रकारे अटक करण्यात येत आहे. सुळे ताई ह्याला आणीबाणी म्हणतात. राज्य सरकारचा निषेध निषेध निषेध’ अस ट्विट करत निलेश राणेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.
अर्नब गोसामीसारख्या सीनियर पत्रकाराला कसलीही नोटीस नसताना खेचून मारून पोलिस व्हॅनमध्ये टाकण्यात आलं व अपमानित करून अटक करण्यात आली. जे राज्य सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अशाच प्रकारे अटक करण्यात येत आहे. सुळे ताई ह्याला आणीबाणी म्हणतात. राज्य सरकारचा निषेध निषेध निषेध!!!
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 4, 2020
दरम्यान, केंद्रा सरकारनं कांजूरमार्गमधील प्रस्तावित मेट्रोच्या कारशेडच्या जागेवर दावा सांगितला आहे. तसं पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवलं आहे.यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार निशाणा साधला होता. मिठागराची ती जागा राज्य सरकारचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर पहिला अधिकार हा त्या राज्याचाच असतो, असं सांगतानाच केंद्र सरकार सातत्याने राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी आणत आहे, असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. यावरूनच आता निलेश राणे यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री बदलल्यानंतर जागेची मालकी बदलते का? महापौरांचा भाजपला थेट सवाल
- महाराष्ट्राची अवस्था ‘आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना’ अशी करण्याचे षडयंत्र – पेडणेकर
- मेट्रोचं काम थांबवण्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान, नवाब मलिकांचा आरोप
- …मग मेधा कुलकर्णींना का डावललं ? छगन भुजबळांचा चंद्रकांतदादांना खोचक सवाल
- कर्ज आणि चलन बाजाराच्या वेळांमध्ये बदल, आरबीआयचा मोठा निर्णय…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

