मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्र सरकारवर सतत निशाणा साधल्यानंतर रिपब्लिक टीव्हीसह अन्य काही वाहिन्यांचा टीआरपी स्कॅमसमोर आला आणि अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली.
आता आणखी एका प्रकरणावरून आज त्यांना अचानक अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.
यावरून आता राजकारण पेटलं असून भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. अर्नबवर केलेली कारवाई म्हणजे सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. असे आरोप विरोधी पक्ष करत असतना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सगळे आरोप फेटाळले असून कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही, महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसारच कारवाई करेल अस स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- सुळे ताई याला आणीबाणी म्हणतात, अर्नबच्या अटकेवरून निलेश राणेंचा घणाघात
- बस इतना याद रखना…हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगा के! – नितेश राणे
- बॉलिवूडचा हास्यअभिनेता विजय राजला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक….
- डिसेंबरमध्ये गोव्यात होणार १४वा सनबर्न महोत्सव…
- भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आज दाखल होणार तीन राफेल विमानं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

