मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप होतोय. शिवाय त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचारांचे आरोप झाल्याने त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. ही चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे करणार असून याचा अहवाल ते राज्य सरकारला सादर करणार आहेत.
गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर त्यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबरोबरच अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी याबाबतची चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे ठाकरे सरकारकडे केली होती. त्यानुसार ठाकरे सरकारने परमबीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या वतीने परमबीर सिंह यांच्याविषयीचे चौकशीचे हे दुसरे प्रकरण आहे, ज्यामध्ये तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळील स्फोटकांप्रकरणात तपासाची दिशाभूल केल्याबद्दल परमबीर सिंह यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आलेत.
अनुप डांगे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी २०१९ मध्ये एका पबवर छापा टाकला असता पबचे मालक जीतू निवलानी यांनी परमबीर सिंह यांच्याशी आपले संबंध असल्याची धमकी त्यांना दिली होती. त्यानंतर संबंधित पब मालकाविरुद्ध खटला भरण्यासाठी विभागीय कार्यवाही करत असताना आपल्याला निलंबित करण्यात आले होते, असा दावा अनुप डांगे यांनी केला. अनुप डांगे यांच्या दाव्यानुसार त्यांना पब मालकाच्या सांगण्यावरून परमबीर सिंह यांनीच अडकवले होते. परमबीर सिंह यांच्या जवळच्या एका व्यक्तीने त्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करण्यासाठी २ कोटींची मागणी केल्याचाही दावा डांगेंनी केला होता. सध्या अनुप डांगे यांना गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा रुजू करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे? पटोलेंचा सवाल
- ४५ ते ५९ वयोगटातील ६० हजार नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस!
- उस्मानाबादेत महावितरणचा ढिसाळ कारभार, मुख्य वाहिनी तुटल्याने वीजपुरवठा खंडित
- शाळासिद्धि अंतर्गत, शाळांना स्वयंमूल्यमापनाच्या सूचना
- विमानाची प्रवाशी संख्या कोरोनामुळे घटली, नांदेड विमानतळावर शुकशु


