Share

मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांसमोर केजरीवालांना फटकारले, म्हणाले..

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज संवाद साधला. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींकडे ऑक्सिनजचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगत मदतची मागणी केली. पण मोदी आणि केजरीवाल यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचे टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण होत असल्याने मोदी नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी ऑनलाईन बैठकीतच केजरीवालांना खडेबोल सुनावले.

ऑनलाईन बैठकीत कोरोनासंबंधी राष्ट्रीय योजना असेल तर केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारं त्यादृष्टीने काम करतील असे अरविंद केजरीवाल सांगत होते. या बैठकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूतील मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.

केजरीवाल आपले म्हणणं मांडत असतानाच पंतप्रधानमोदी यांनी त्यांना रोखलं आणि फटकारलं. मोदी म्हणाले की, ‘मुख्यमंत्री अशा अंतर्गत बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण करणं आपली परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. हे योग्य नाही. आपल्याला नेहमी याचं पालन केलं पाहिजे’.

यानंतर केजरीवाल यांनी दिलगिरी व्यक्त करत पुढील वेळी हे लक्षात ठेवू असं सांगितलं. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपलं म्हणणं पूर्ण करत आपण काही चुकीचं केलं असेल तर माफ करावे असे म्हटले. यावेळी त्यांनी मोदींना आपण दिलेल्या निर्देशांचं पालन केलं जाईल असं आश्वासन दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!