औरंंगाबाद : घराच्या गॅलरीत खेळत असतांना अचानकपणे खाली पडून गंभीर जखमी झालेल्या दोन वर्षीय चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१२) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पैठणगेट परिसरातील सब्जीमंडी येथे घडली. हुसेनन नईम बागवान (वय २, रा.सब्जीमंडी, पैठणगेट परिसर) असे दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठणगेट परिसरातील सब्जीमंडी परिसरात नईम बागवान हे कुटुंबियासह राहतात. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचा दोन वर्षाचा लहान मुलगा हुसेनन नईम बागवान हा घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता.
खेळत असतांना अचानकपणे तोल जावून तो खाली पडून बेशुध्द झाला होता. हुसेनन नईम बागवान याला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले असता उपचार सुरू असतांना सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रशांत किशोर-शरद पवार यांची भेट भाजपसोबत शिवसेना आणि कॉंग्रेससाठी देखील धोक्याची घंटा ?
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- ‘मी लठ्ठ असले तरीही…’, आपल्या लठ्ठपणावर बोलली विद्या बालन
- श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडूंना राहावं लागणार ‘इतके’ दिवस ‘क्वारंटाइन’
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

