Share

प्रशांत किशोर-शरद पवार यांची भेट भाजपसोबत शिवसेना आणि कॉंग्रेससाठी देखील धोक्याची घंटा ?

Published On: 

मुंबई : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.या भेटीची चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे.किशोर यांनी   पवारांशी साडेतीन तास चर्चा केली. त्यामुळे या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत दिली आहे.

मलिक म्हणाले, प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारसाहेबांना दिली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारसाहेबांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.

दरम्यान, मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपविरोधी आघाडी तयार करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे प्रशांत किशोर आणि पवारांच्या भेटीत याच मुद्दयावर चर्चा झाल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. ही आघाडी कशी निर्माण करता येईल. त्यात कोणते पक्ष येऊ शकतात, भाजविरोधी भूमिका घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या इतर पक्षाच्या नेत्यांना कसे जवळ आणता येईल, यावरही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, मलिक जरी हा दावा करत असले तरीही हा दावा एक राजकीय नेता करत असल्याने यावर किती विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या भेटीत कॉंग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी बनविण्याबाबत देखील चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोबतच महाराष्ट्रात राष्ट्रवादीला कश्या पद्धतीने क्रमांक एकच पक्षन बनवता येईल याबाबत देखील नक्की मंथन झाले असणार असे देखील अंदाज लावले जात आहेत. सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे मात्र आगामी काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कसा बनवता येईल याबाबत देखील चर्चा झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

मलिक यांनी सारवासारव करताना मुख्य बाबी सोडून बाकी सर्व गोष्टींवर भाष्य केले. दरम्यान,या संभाव्य आघाडीमध्ये कॉंग्रेसचे नेमके स्थान काय असणार? पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असणार? कुणाच्या नेतृत्वात ही आघाडी स्थापन होणार याबाबत विशेष काही माहिती मलिक यांनी का दिली नाही या प्रश्नांची उत्तरे अजून देखील गुलदस्त्यात आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!