Share

‘मी लठ्ठ असले तरीही…’, आपल्या लठ्ठपणावर बोलली विद्या बालन

Published On: 

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या सक्षम भूमिकेसाठी ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षापासून विद्याने वेगवेगळ्या धाटणीची भूमिका करत बॉलीवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान बनवले आहे. गेल्या वर्षी ‘शंकुतला देवी’ या चित्रपटाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा एका नव्या रुपात ती प्रेक्षकांच्या भेटली येत आहे. ‘शेरनी’ हा चित्रपट १८ जूनला अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होत आहे.

विद्या बालनने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, माझ्या आयुष्यातील अनुभवांवरुन आणि विशेषतः अभिनेत्री म्हणून मला जाणवलं की मी माझ्या मार्गात कोणताही अडथळा येऊ देणार नाही. मला जर कोणी अभिनेत्री म्हणून तू खूप बारीक आहेस, लठ्ठ आहेस, खूपच बोल्ड आहेस, बेशरम आहेस किंवा खूपच समजूतदार आहेस किंवा काहीही म्हणलं तरी मी आहे अशी आहे. मी स्वतःला बदलणार नाही, परंतु माझा मार्ग मी निवडते.

विद्या पुढे म्हणते की, मी कामाबद्दल असलेल्या आवडीवर लक्ष केंद्रीत करते कारण मी स्वतःला बदलू शकत नाही. मी कोणतीही लीग तोडण्याचा प्रयत्न करीत नाही तर मी माझ्या विचारांनुसार भूमिका निवडते. एक अभिनेत्री म्हणून मी स्वतःच्या मार्गाने प्रगती करीत आहे.

१९९५ सालच्या ‘हम पांच’ ह्या झी टीव्हीवरील विनोदी धारावाहिकामध्ये काम करून विद्याने अभिनयाची सुरूवात केली. २००५ सालच्या परिणीता ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. विद्या बालनने अनेक चित्रपटातून चाहत्यांचे मन जिंकले. विद्या बालन आपल्या वेगळ्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. विद्या बालनने नेहमीच वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक वेळेस विद्याने आपल्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांशी सवांद साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!