Share

दुर्दैव! पोहण्याच्या मोहात दोघा मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

Published On: 

औरंगाबाद : झाल्टा गायरान शिवारात पावसामुळे नाल्यातील साचलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह अनावर झाल्याने, त्या साचलेल्या पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. अनिल किसन मगरे वय २६, शेख शाहरुख शेख चांद वय २० अशी दोघांची नावे आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळेल ते काम करून उपजीविका भागवणारे अनिल आणि शाहरुख हे दोघे चांगले मित्र होते. अनिल सुंदरवाडी येथे तर शाहरुख इंदिरानगर गारखेडा भागात राहत होते. गुरुवारी शाहरुख अनिलला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. तिथून ते फिरण्यासाठी गेले. झाल्टा येथील गायरान परिसरात पावसाच्या पाण्याने नाला भरला होता. पाण्याला पाहून दोघांनाही पोहण्याचा मोह अनावर झाला असावा त्यानंतर ते काठावर कपडे ठेऊन पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाले असा अंदाज स्थानिकांनी बांधला.

परिसरातील तरुण काही वेळानंतर तिथून जात असताना त्यांना तिथे दोन व्यक्तींचे कपडे, चप्पल-बूट दिसले. त्यानंतर नाल्याजवळ पाहणी करत असताना हां प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ हि माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या सहाय्याने दोघांना पाण्यातून बाहेर काढत, त्यांना घाटी दवाखान्यात पाठवले. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!