मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक मान्यवरांनाही या संसर्गाची लागण झाली आहे. तसेच या काळात देशभरात अनेक ठिकाणी अपुऱ्या औषधामुळे आणि अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्णांना जिव गमवावा लागत आहे. यादरम्यान भारताचे फ्लांइग सिख म्हणून प्रसिद्ध असेलेले मिल्खा सिंग यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर मिल्खा सिंग यांना 31 मे रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, गुरुवारी अचानक त्यांची तब्येत बिघडली ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतर त्यांनी पीजीआयच्या कोविड रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. याठिकाणी त्यांना आयसीयू वार्डात दाखल करण्यात आलं आहे.
पीजीआयचे प्रवक्ता प्रोफेसर अशोक कुमार यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, की ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतर मिल्खा सिंग यांना कोविड रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भर्ती करण्यात आलं. त्यांना दुपारी ३ वाजून 35 मिनिटानं अॅडमिट करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाथाभाऊंनी आग्रह केला, ‘जेवण करून जा!’; फडणवीस म्हणाले, ‘आज नको, पुढच्या वेळी नक्की करेन’
- ‘गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये’
- २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असं काम करा; पटोलेंनी पुन्हा ठोकला ‘स्वबळाचा’ शड्डू
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘मला घाई होती, त्यामुळे पत्रकार परिषदेत ‘तत्वतः’ मान्यता हा शब्द राहिला’; वडेट्टीवारांच अजब स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

