नागपूर : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १८ जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्याची घोषणा माध्यमांद्वारे केली. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि एकूण ऑक्सिजन बेड्स फक्त २५ टक्के व्यापलेले असतील तिथे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अगदी थिएटर्स पासून ते सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने तेही उद्यापासूनच सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते.
यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, आता याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसून याबाबत स्थानिक स्तरावर आढावा घेतल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, हा निर्णय अद्याप विचाराधीन असल्याचं माहिती व जनसंपर्क खात्याकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आधी घोषणेची घाई नंतर निर्णय मागे घेतल्याची घाई. यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
आता याबाबत विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा माध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘एकूण ४३ भाग करण्यात आले आहेत. यात जिल्ह्यासह १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका यांचा समावेश आहे. यात पॉझिटिव्हिटी रेट व व्यापलेले ऑक्सिजन बेड्स याच्या आधारावर पाच स्तर निर्माण करण्यात आले आहेत. याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री याबाबत अधिकृत घोषणा करतील. मी संबंधित खात्याचा मंत्री म्हणून बैठकीनंतर माहिती दिली. मात्र, तत्वतः हा शब्द राहिला असेल,’ असं अजब स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे.
दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाने हा निर्णय विचाराधीन असून गोंधळ सावरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, जिल्हा स्तरावरून देखील याबाबत जनतेला माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे सध्यातरी वडेट्टीवार यांनी जाहीर केलेली माहिती ही लागू होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाथाभाऊंनी आग्रह केला, ‘जेवण करून जा!’; फडणवीस म्हणाले, ‘आज नको, पुढच्या वेळी नक्की करेन’
- कोरोनामुळे आई-बहिणीला गमावल्यानंतर वेदा कृष्णमुर्तीने पहिल्यांदाच व्यक्त केली भावना, म्हणाली..
- २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असं काम करा; पटोलेंनी पुन्हा ठोकला ‘स्वबळाचा’ शड्डू
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘विधानसभेतील पराभव अल्पविराम आहे, पुर्णविराम नाही’, धनंजय मुंडेंकडून पराभूत झालेल्या प्रकारावर पंकजा मुंडेंचे भाष्य


