Share

‘गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये’

Published On: 

मुंबई – भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसून येत आहेत. धनगर आरक्षण,ओबीसी आरक्षण,मराठा आरक्षण या मुद्यांवरून ते आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरत आहेत.

पडळकर हे महाविकास आघाडी सरकारवर टीका करतच असतातच पण विशेषतः पवार घराण्यावर अत्यंत शेलक्या शब्दात टीकेची झोड उठवताना पाहायला मिळतात. राज्यातील विविध मुद्यांचा,पुराव्यांचा संदर्भ देत ते थेट खा. शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शरसंधान करताना दिसून येत आहेत. आज त्यांनी राज्य सरकारने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेवर टीका केली मात्र ही टीका करताना देखील त्यांनी पवार यांचे नाव घेतलेच.

पडळकर यांच्याकडून वारंवार हल्ले चढवले जात असताना आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हे भाजप या पक्षाचे बुजगावणं आहेत या बुजगावण्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये असं आवाहन त्यांनी केले आहे.

खरात म्हणाले, पडळकर यांनी उठ सूट आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय अजितदादा यांच्यावर टीका करण्यापेक्षा धनगर समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सरकार समोर उपाययोजना मांडव्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने अभिव्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे पण गैरवापर करण्याचा अधिकार दिला नाही त्यामुळे टीका करताना आपली स्वतःची राजकीय उंची तपासावी असा टोला सचिन खरात यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!