🕒 1 min read
मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार बनल्यानंतर या सरकारच्या भूमिका पूर्णपणे बदलले आहेत. पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारी लोक आता मंदिर उघडण्यापासून का दूर जात आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. राज्यभर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारनं नियमावली बनवून मंदिर उघडं अपेक्षित होते, परंतु दुर्देवाने सरकार कुठल्याच विषयात गंभीर नाही अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
मंदिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. त्या लोकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. नियमावली बनवून मंदिर उघडण्यास काही हरकत नाही परंतु हे सरकार अहंकाराने भरलेला आहे. लोकांना काय वाटते यापेक्षा आम्हाला काय वाटतं तेच करू यावर सरकारचा भर असतो. सरकारने मंदिर उघडली नाहीत आणि राज्यभर मंदिर खोलो आंदोलन सुरू झालं तर भाजपा त्यांच्यासोबत उभी राहिल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील असा इशारा दरेकर यांनी दिला.
बेळगावमधील मराठी भाषिकांना न्याय मिळवून दया
सरकारच्या बाहेर राहून आरडा-ओरड करणे सोपे असते, परंतु सरकारमध्ये गेल्यानंतर त्या विषयातून मार्ग काढण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात, ते परिश्रम घेताना हे सरकार दिसत नाही. सरकारच्या बाहेर राहून तुम्ही यापूर्वी बेळगाव सीमाप्रश्र्नी टोकाची संघर्षाची भूमिका घेत होतात,मात्र आता सत्तेत असून सुद्धा याबाबतीत काही निर्णय घेताना दिसत नाही. यावेळी तुम्ही आपली अहंकाराची भावना बाजूला ठेवून बेळगाव मधील लोकांना न्याय मिळेल अशी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मतही दरेकर यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा करणार – अनिल देशमुख
- ‘या’ काँग्रेसशासित राज्यात फटाके फोडण्यास बंदी
- खडसेंची आमदारकी धोक्यात? राज्यपाल नियुक्त जागेसाठी खडसेंच्या नावावरून वाद !
- शिल्पा शेट्टी बनवणार टिकटॉकला टक्कर देणारे नवे ऍप
- काँग्रेसला नाराजीचा मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज नेता स्थापन करणार नवा पक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
