Share

खडसेंची आमदारकी धोक्यात? राज्यपाल नियुक्त जागेसाठी खडसेंच्या नावावरून वाद !

Published On: 

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी चार दशकांचा भाजपसोबत असलेला संसार मोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना महत्वाचं मंत्रिपद व राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

मंत्रिपदावरून अद्याप कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि एकनाथ खडसे यांनी सांगितलं असलं तरी राज्यपाल नियुक्त कोट्यातून होणाऱ्या १२ जागांपैकी राष्ट्रवादीतर्फे खडसेंच नाव निश्चित करण्यात आलं आहे. मात्र, खडसेंच्या या आमदारकीवरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी राज्यपालांची भेट घेऊन एकनाथ खडसेंच्या नियुक्तीला विरोध केला आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ खडसे यांचं नाव राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी पाठवण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 1 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांनी एकनाथ खडसे यांचा नावाला विरोध केला.

खडसेंचं नाव यादीत येणे हे संतापजनक आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. भ्रष्टाचारी नेत्याला पुन्हा एकदा राजकारणात आणले जात आहे. खडसे हे पुन्हा जर राजकारणात सक्रीय झाले तर भ्रष्टाचाराविरोधी लढ्याला काही अर्थ राहणार नाही, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!