Share

‘या’ काँग्रेसशासित राज्यात फटाके फोडण्यास बंदी

Published On: 

राजस्थान : तब्बल वर्षभरापूर्वी आलेल्या कोरोना संकटाने संपूर्ण जगाला वेठीस धरल आहे. कोरोना संसर्ग, रुग्ण, लाॅकडाऊन आणि मृत्युदर हे चक्र गेल्या वर्षभरापासून जगभरात अनुभवले जात आहे. गेल्या काही महिन्यात कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यानुसार लोकशाही प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली मात्र आता पुन्हा अनेक देशांमध्ये कोरणा ची दुसरी लाट आल्याने भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान कोविड १९ च्या पार्श्ववभूमीमुळे दिवाळीमध्ये फोडले जाणाऱ्या फटाक्यांच्या विषारी धुरापासून कोरोनाग्रस्तांच्या संरक्षणासाठी संपूर्ण राज्यात फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे धूर सोडणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आलेत. दिवाळीच्या तोंडावर राजस्थान सरकारने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घातली आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सांगण्यानुसार, कोरोना काळात राज्यातील नागरिकांच्या जीवाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. आतिशबाजीतून निर्माण होणाऱ्या धुरामुळे कोरोनाबाधितांसोबत हृदय आणि श्वासनाची आजारांनी असणाऱ्या रुग्णांनाही त्रास होतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत लोकांनी आतिशबाजी करू नये.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!