Share

काकांनी आता निवृत्त व्हावे; पुतणे आशिष यांचा अनिल देशमुखांना घरचा आहेर

Published On: 

नागपूर:- राष्ट्रवादीचे दिग्गज नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेस नेते आशिष देशमुख या राजकीय क्षेत्रातील काका-पुतण्यामधली ‘तू तू मै मै’ पुन्हा एकदा उघड्यावर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख काका काटोल मतदारसंघातून गायब झाले आहेत, असं म्हणत पुतणे आशिष देशमुख यांनी घरचा आहेर दिला आहे. ते ‘tv9 मराठी’शी बोलत होते.

अनिल देशमुख हे नागपुरातील काटोल या आपल्याच मतदारसंघातून गायब आहेत. त्यांच्यावर काटोलची जनता नाराज आहे. गेल्या सव्वा वर्षात कोणतीही कामं झालेली नाहीत, त्यामुळे मी सक्रिय व्हावं, अशी जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे, असं आशिष देशमुख म्हणाले आहेत.

आगामी काळात काँग्रेस सत्तेत येणार, असा विश्वासही आशिष देशमुखांनी बोलून दाखवला आहे. अनिल देशमुख औरंगाबादमध्ये कोणाकोणासोबत दिसतात, असा टोलाही त्यांनी काकांना लगावला आहे.

आशिष देशमुख हे 2014 ला नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार झाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हाती धरला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!