Share

कापसाचे दर स्थिरावले; कापूस उत्पादकांनो, योग्य निर्णय घेण्याची हीच वेळ!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : यावर्षी कापसाला चांगला दर मिळाला. पण सध्या कापूस दर स्थिरावले आहेत. युध्दजन्य परस्थितीमुळे कापसाचे दर थांबले आहेत असे बोलले जात आहे. तर या परिस्थितीत कापूस उत्पादकांनी कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न कापूस उत्पादकाला पडत आहे. अशावेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे असते.

जानेवारी महिन्यामध्ये कापसाला 11 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. पण सध्या हा 8 ते 10 हजारांवर दर स्थिरावले आहेत. त्यामुळे कापसाची साठवणूक करावी? का विक्री? हे प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. युध्द थांबल्यानंतर पुन्हा बाजारपेठेतले दर सुधारतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या कापूस साठवणूक करून योग्य वेळ साधून कापूस विक्री करणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल. कांदा उत्पादक जसे निर्णय घेतात अगदी तसेच कापूस उत्पादकांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

यावर्षीच्या हंगामात गेल्या 10 वर्षात जो दर मिळाला नाही तो दर मिळाला आहे. आणि मागणीत घटही झालेली नाही. फक्त निर्माण झालेल्या परस्थितीमुळे कापूस दरात घट झाली. युद्ध थांबले की दर वाढतील शेतकऱ्यांनी गडबड न करता टप्प्याटप्याने विक्री केली तर अधिकचा फायदा होईल असे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!