Share

आसाम : एनआरसीच्या अंतिम यादीतून १९ लाख बाहेर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीची अंतिम यादी आज सकाळी दहा वाजता प्रकाशित झाली. दरम्यान या यादीत १९ लाख ६ हजार ६५७ लोकांची नावं समाविष्ट केलेली नसल्याचं एन आर सी अधिकाऱ्यांनी सांगितलं. या यादीत एकूण ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या अंतिम यादीसंदर्भात काँग्रेसने दिल्लीत बैठक आयोजित केली आहे.

एनआरसीआसाम या अधिकृत संकेतस्थळावर नागरिक या यादीत आपलं नाव आहे का हे तपासू शकतात. या यादीत समावेश नसलेल्या नागरिकांना राज्य सरकार आवश्यक ती कायदेशीर मदत करेल असं आश्वासन आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिलं असून राज्यात शांतता आणि सलोखा राखण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

एनआरसीच्या अंतिम यादीत एखाद्याचे नाव नसले याचा अर्थ तो परदेशी नागरिक आहे असा नव्हे, कारण त्याबाबतचा निर्णय योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतर परकीय नागरिक लवाद घेऊ शकतो. त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी सरकार आहे. ज्यांचे नाव अंतिम यादीत नसेल त्यांना ते भारतीय नागरिक आहेत हे सिद्ध करण्याची पुरेशी संधी दिली जाईल, असेही सोनोवाल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!