Share

शरद पवारांविरुद्ध निवडणूक लढणार नाही, उदयनराजेंना अश्रू अनावर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि हरियानामधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकांसह देशातील अनेक ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा मात्र केली नव्हती.

मात्र आता निवडणूक आयोगाने एक पत्रक काढून सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतचं होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उदयनराजेंना मोठा दिलासा मिळाला आहे. उदयन राजे यांनी जेव्हा भाजप प्रवेश केला तेव्हा विधानसभा निवडणुकीच्यावेळी लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली होती.

याविषयी आज सातारा येथे पत्रकार परिषद पार पडली. शरद पवारांविषयी बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. त्यांनी  जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, अस विधान केले. तसेच शरद पवार हे माझ्या वडीलस्थानी आहेत असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने साताऱ्यातून शरद पवार हे निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु आता शरद पवार जर मैदानात उतरले तर उदयनराजेंनी माघार घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1176428175041024001?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176427932417347584?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176427695619469313?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!