🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी विधानसभेसोबत मतदान होत आहे. यासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी तयारी सुरु केली आहे. सातारा येथे त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी भाजपासोबत आलो आहे. विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्याच सर्वच उमेदवारांचा जाहीर प्रचार करणार आहे, मात्र मागील निवडणुकीत मला तुम्ही पळायला लावले तसे यावेळी करू नका असं स्मितहास्य करत कार्यकर्त्यांना विनंती केली.
पुढे बोलताना त्यांनी माझ्यावर इतक्या केसेस कशा आहेत, असे मला निवडणूक आयोगाने विचारले होते. यावर मी त्यांना सांगितले मला अन्याय सहन होत नाही. माझ्याशिवाय दुसरा तुमची कोण काळजी घेणारा असेल तर सांगा मी त्यांचा मुख्यप्रचारक म्हणून काम करतो, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.
दरम्यान, उदयनराजे यांनी आपण लोकसभेसाठी आणि शिवेंद्रराजे विधानसभेसाठी १ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार आहोत असेही सांगितले. त्यामुळे आता आघाडीतर्फे कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178168959176019969?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178168780989448193?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178162854089805826?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
