Share

सगळी पद भोगली आता मुख्यमंत्री पदाचा विचार करेल : रावसाहेब दानवे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: आपल्या भाषाशैलीमुळे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे कायम चर्चेत असतात. ते जे बोलतात त्यावरून वाद आणि चर्चा होत राहते. आता येत्या काळात मुख्यमंत्रिपदाबाबत विचार करणार असल्याचे सूचक वक्तव्य दानवे यांनी केले आहे. जालन्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमावेळी एका समर्थकाने जालन्याचा मुख्यमंत्री हवा आहे, अशी मागणी केली. यावेळी दानवे यांनी आपल्या स्टाईलने उत्तर देत, सरपंचापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळी पदे भोगून झाली. आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही. परंतु मुख्यमंत्रिपदाबाबत पुढे विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दानवे यांनी विधानसभा निवडणुकीचे देखील भाकीत केले आहे. राज्यात १३ सप्टेंबरपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार त्यांनी सांगितले. साधारण १५ ऑक्टोबरच्या आसपास मतदानप्रक्रिया पार पडेल.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!